आपुलकी
आपुलकी
1 min
533
आजही आपुलकीने विचारतात,
माणसं माणसाला,
तेव्हा मन भरून येते...
या स्वार्थी जगात, आपलेसे वाटणारे नाते
मनाला सुखावून जाते...
माणुसकी जपायला लागतेच काय?
प्रेम आणि काळजीचे काही मनातले भाव,
आताचा काळ, असाच
माणसाला ओळखण्याचा,
एकमेकांसाठी प्रार्थना करण्याचा...
भाऊ, बहिणी, जावा जावा
झाल्या आज एकत्र...
मुलं सारी जवळ आली
सजग झाला पै पाहुणा...
कोण म्हणतो,
नाश पावेल सगळं काही आता?
देशात आपल्या आहे अजून,
काळजी, प्रेम, माया, प्रार्थना
दूर दूर पळून जाईल,
तो जीवघेणा कोरोना बिरोना...
