नातं
नातं
1 min
95
आठवणींची उजळणी ,
थोडे उसासे ,थोडे दिलासे ,
कधी लटके राग तर
कधी बंध रेशमाचे,
कधी तुझं काळीज चिरणारा अबोला ,
तर कधी माझे तेच तेच गाऱ्हाणे,
कधी तू तुझाच फक्त ,
कधी मी माझीच...
तुझं ते सामावून जाणे ,अन
माझे दुरावणे ,
मी अशी एककल्ली ,तू मात्र वादळी,
तुझ ते नेहमीच, संभ्रमित वागणं अन
माझं पुन्हा भावनाविवश होणं..
कुठं आणि कधीच
न समजणार न संपणारं नातं..
गुंतून गेलय एकमेकात ,
पारम्ब्यांनीही आता वड उभा केलाय,
हळू हळू आपल्या नात्यात....!!!
