क्लोजप closeup
क्लोजप closeup
Close up क्लोजप
फोटो मध्ये
भयंकर अंतर असते...
चेहरे Close close असले..
तरी मन दुरावलेले असते!
तुझं माझं हास्य जरी
इतरांसाठी हसरे असते ..
तरी त्या मागे दडलेली वेदना
फक्त आपल्यालाच ठाऊक असते,
Close close असले तरी
मन दुरावलेले असते...
Closeup फोटो मध्येही
भयंकर अंतर असते...
तुझ्या गळ्यात गळा ,
हातात हात घालून फोटो
नेहमीच काढायचे असतात..
पण कधी ...खरं तर..
त्या गळ्यात पडून खूप रडावेसे वाटते,
हातात हात धरून..
दूर कुठं जाऊन यावं ,असंही
मनात कायम वाटत असते....
Close close फोटो मध्ये
भयंकर तांडव असते..
Close close असलो तरी
मन दुरावलेले असते...
तुझी ती पकड आता
सैल झालेली असते,
अलगद ठेवायचं म्हणून
ठेवलेले खांद्यावर चे हात...
झटकन काढायची ,घाई झालेली असते...
Close close असलो तरी...
मन दुरवलेलं असते..
चल आता पुन्हा ,
सेल्फी काढुया जवळ येऊन..
नाहीतरी ..
लगेच दूर उभे राहायचे असते..
पहायचे ही नसते मागे वळून..
Close close असलो तरी....
मन दुरावलेले असते.!
Closeup फोटो मध्ये
बरेच अंतर असते...
