STORYMIRROR

Vrushali Vajrinkar

Others

3  

Vrushali Vajrinkar

Others

हाक प्रेमाची

हाक प्रेमाची

1 min
297

एक प्रेमाची हाक होती पुरेशी ,

हीच एक मिमांसा बाळगून होते उराशी ...

कधी शब्दात तर कधी डोळ्यात

कधी मिठीत तर कधी भेटीत ..

नेहमीच मांडल्या होत्या भावना मनीच्या !

अंतरंगात तर नेहमीच झाकून झाल

तर कधी हृदयातल्या तारांनी छेडल..

कधी विरहाचे उसासे तर ,

कधी प्रीतीचे ओसंडून वाहणारे दिलासे ..

कधी त्या आठवणींना उजाळा

तर कधी अश्रू घळाघळा ...

मनाचा हृदयाशी तर ..

भावनेचा आवेगाशि नेहमिचाच खेळ ..

कधी प्राक्तन कधी प्रारब्ध

कधी भाव तुझे विरक्त

मी मात्र नेहमीचीच

होत राहिले व्यक्त ....

कुठे आणि कसे थांबतील ,

मला माहित नाही..

मीही अजून तसे काही

योजिले नाही ...

तो चंद्रमा तो हिंदोळा,

रोमरोम शहरणारा वारा ..

नेहमीच असतील माझ्या

कवितेत माझ्या सोबतीला...

अव्यक्त मनाचे भाव,

‎ लेखणीतून साकारणारा

‎ जिवंत मनाचा हा गाभारा...

‎व्यक्त होत जातो तसा ,

‎उजळून निघतो

‎मनाचा अदृश्य कोपरा!


Rate this content
Log in