गुडबाय कोरोना
गुडबाय कोरोना
1 min
431
31 मार्च सरले आणि आठवले
मार्च ने आपल्याला खूप काही शिकवले,
अचानक साऱ्याना घरात बसवले..
काम धाम सोडून फक्त
जीवन जपायला शिकवले,
"जान है तो जहान है" हेच सिद्ध झाले..
नातेवाईक, सगेसोयरे
घरच्यांचीही साथ मिळाली अशा वेळी ,
आणि क्वारंटाईन सुखकर झाले,
देवळातल्या देवालाही,
थोडी विश्रांती मिळाली
पशुपक्षी आनंदाने,
मुक्त विहार करू लागले
माणसाला कानाकोपऱ्यात,
डोळे फाडून शोधू लागले,
होईल सगळं सुरळीत
चला प्रार्थना करू
एप्रिल मध्ये कोरोना ला
"गुड बाय 'करू...
स्वीट स्वीट आपल्या घरातच राहू
