Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vrushali Vajrinkar

Others

3  

Vrushali Vajrinkar

Others

गॅस ओटा

गॅस ओटा

1 min
543


ती उभी असते ओट्याजवळ तासन तास

बंद चालू करत असते शेगडी चा गॅस...

पहाट ते रात्री पर्यन्त

ती शिजवत असते खाद्य..कुटुंबासाठी


मनातल्या विचारांची जुळणी करत करत

ती फिरवते भाजीत डाव...

‎कधी गोल पोळ्या लाटताना

तिला आठवते बालपण,


कधी फोडणी टाकताना

चर चर आवाजात तिला

आठवतो माहेरचं अंगण...


कधी उकळून ,उतू जात असते दूध

तरी भानावर नसते ती..

तिच्या विचार शृंखला अशा

उफाळून बाहेर येतात तेंव्हा ती

ती गडबडते,


‎घाईघाईत गॅस बंद करते ,

‎चुकल्या सारखे अपराधी भाव घेऊन

‎ ‎ती भरभर ओटा साफ करते..

‎तिच्या या ओट्या जवळच्या ,

‎असंख्य तासात ती ‎खूपदा ,

‎स्वतःशी बोलत असते मनातल्या मनात..

‎कधी काटे उमटतात सर्वांगात


‎आठवत राहतात संसारातील

‎उणे दुणे, ‎चढ उतार ,

‎कधी भाजी भाकरीतही सुखाचे क्षण

‎तर गोडधोड करूनही दुःखी मन...

‎‎कळत नकळत ती सावरते स्वतःला ,

‎कधी आनंदाने उकळी फुटलेले तिचे मन,

‎चपळपणे सगळं उरकत असत,

‎तर कधी निराश मन

‎करपलेली भाजी पुन्हा परतत असत..,

‎असंख्य क्षण हे तिचे ,

‎गॅस ओट्याजवळ व्यतीत होतात,

‎मनातल्या काहूरांना विझवायला

‎ओट्यावरची भांडीही तिला

‎आपलंसं करतात..

‎ तर कधी आनंद साजरा करायलाही

‎तिला खुणावतात..

‎त्याच्यावर ती रुसते,

‎ कुरवाळते कधी रागावते,

‎घासत राहते त्याला

‎चकचकीत करण्यासाठी..

‎अलगद लपवून ठेवते

‎त्याच्या कपारीत आपले मनीचे रहस्य..

‎आणि म्हणते !बघ !

‎कसे आवरलं आहे मी आज सगळं!

‎मनातला पसारा मनातच ठेऊन

‎ती स्वच्छ चकचकीत ओट्याशी ,

‎पुन्हा उभी राहते ,

‎नव्या विचारांचे खाद्य घेऊन!!


Rate this content
Log in