Revolutionize India's governance. Click now to secure 'Factory Resets of Governance Rules'—A business plan for a healthy and robust democracy, with a potential to reduce taxes.
Revolutionize India's governance. Click now to secure 'Factory Resets of Governance Rules'—A business plan for a healthy and robust democracy, with a potential to reduce taxes.

Vrushali Vajrinkar

Abstract Others

3  

Vrushali Vajrinkar

Abstract Others

गुंफण आठवणींची

गुंफण आठवणींची

1 min
11.6K


मी ती लाट नाही

विचाराच्या लाटांनी किती खळखळ माजवली ,

तरी शांत होताना त्या लाटांना

नम्रपणे माघार घ्यावी लागते ....

‎निर्मळ मनाने काठावरती ,

‎आठवणींच बांडगुळ उतरवून

‎त्या निश्चलपणे परतत असतात।

‎ तेंव्हा मलाही वाटत असते

‎आपणही हे ओझं घेऊन

‎ कुठवर फिरणार वाहणार आहोत ,?

‎किनारा आला की ,

‎सोडून द्यायच्या आहेत गाठोड्यातल्या

‎ जीर्ण म्हणता येणार नाहीत पण

‎पुसट होत जाणाऱ्या

‎काही धुरकट आठवणी,।

सोडल्यास का मग ?

‎सहज विचारलं काठांनी

‎वाळूतल्या किटकांनी ,।

‎लाटा म्हणाल्या हो! हे काय !

‎त्या किनार्यवर आणून टाकलेली

‎ही नकोशी संपत्ती आता तूच सांभाळ,।

‎ ओझं कमी होईल समुद्राचं तेवढच..

‎ ,शांतपणे निघून गेल्या लाटा

‎ त्या खोलवर रुजलेल्या

‎आठवणींना सांडून सोडून, ।

‎जाताना बजावलंय .

‎..पुन्हा नाही तू ,समुद्रात विलीन व्हायचस

जमणार आहे का हे मला!

नाही !कधीच नाही ,का ?

कारण ?...

कारण,मी ती लाट नाही।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract