जरासे दुरावणे
जरासे दुरावणे
जराशी दुरावत चालले आहे का मी तुझ्यापासून...
समजत नाही कशी तू माझी
लहानपणापासूनची सखी,
नकळत सोबत राहायला आलीस..
माझ्या विचारातून ,लेखणीतून
वही, पुस्तकात तुझं अस्तित्व
तू सिद्ध केलंस ..
आणि माझ्या मनामनावर
राज्य करत मलाच वश केलंस ,
तेंव्हापासून आवडतेस तू मला ..
म्हणून तुझी सतत काळजी घेतली,
सोबतच राहिले,
तिला a अंजारले गोंजारले,
तुझ्याही नकळत मी
स्वतःवरच खुश झाले,
तू असतेस सोबत म्हणून तुला
गृहीतच धरलं जणू,
अखंड तुला रचत गेले ,वाचत गेले,
मनामनात भिनत गेले ,
तशी मी माझ्यात तुला शोधत गेले,
.तू आहेस जवळच म्हणून कितीवेळा चाचपले...
मग आता का वाटले की मी तुला दुरावले..?
नाही! कविता माझी सखी आहे,
तिच्याशी माझे हितगुज कायमच चालायचे...
कधी तिला, कधी मला
कंटाळा तर येणारच,
म्हणून असे लगेच का म्हणायचे..
काव्य, कविता दुरावली
असे म्हणताच ती परत आली..
माझ्या सोबतीण सखीची
मला खात्री झाली,
माझी कविता मला नाही दुरावली...
