STORYMIRROR

Subhash Charude

Inspirational

3  

Subhash Charude

Inspirational

प्रीती फुले

प्रीती फुले

1 min
13.9K


प्रित फुलांचे पांघरुण घाला तिच्यावरी

सर्व बंधने तोडून ती आली तुझ्या घरी

माहेरचे बंध तुटताना मी तेव्हा पाहिले

विरह अश्रू डोळयातुनी कितीतरी वाहिले

नव बंधनात अडकताना पाहिली ती नारी

प्रित फुलांचे पांघरुण घाला तिच्यावरी

आनंद आणि विरहाचा संगम कसा झाला

प्रित फुलांच्या पडल्या गळ्यात तुमच्या माला

त्या मालांचा सुगंध पसरो तुमच्या दारी

प्रित फुलांचे पांघरुण घाला तिच्यावरी

मनातील भावनांचा सुंदर झाला मेल

प्रित फुलांनी सजवा संसाररुपी वेल

नव लक्ष्मीची पाऊले आली तुमच्या घरी

प्रित फुलांचे पांघरूण घाला तिच्यावरी

संसार सागरी एकमेकांना साथ द्या

कठीण समयी एकमेकांना समजून घ्या

नव चैतन्याचा सुगंध आला तुमच्या घरी

प्रित फुलांचे पांघरूण घाला तिच्यावरी

एकमेकांच्या भावनेचा करा तुम्ही आदर

सदा राहो तुमचा त्यांच्यावर मायेचा पदर

माहेरची माया तोडुनी आली तुमच्या घरी

प्रित फुलांचे पांघरुण घाला तिच्यावरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational