अंकुर ( हायकू )
अंकुर ( हायकू )
एक विचार
मनी रुजला असा
अंकुर जसा.....१
शब्दबध्द तो
कागदी उतरला
नव काव्य तो....२
काहींना छान
मग आवडला
दाद टाळ्याला....३
अंकुरा फुटे
नव अशी पालवी
स्वप्न फुलवी....४
बहरदार
वटवृक्ष व्हावे
ते डेरेदार....५
