डाव नियतीचा
डाव नियतीचा
आयुष्याच्या क्लिष्ट पटावर
डाव नियती मांडत असते..
सद्गुणांच्या फास्यांनी
दान पदरी पडायचे असते..!!
आलेगेले कितीही शकुनी
धर्मास मात्र जागवावे लागते..
दुर्योधानाची मांडी तोडण्या
अंगी भीमास रुजवावे लागते..!!
लज्जा रक्षणा भगिनींच्या
श्रीकृष्णापरी धावयाचे असते..
अधर्मा विरुद्ध लढण्यास
पार्थासम गांडीव उचलायचे असते..!!
लोक हितासाठी कधीतरी
नरोवा कुंजरोवा म्हणावे लागते..
नियतीच्या ह्या डावात
विजयास गवसणी घालावीच लागते..!!
