STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

रविवार गरम गरम गरम...!

रविवार गरम गरम गरम...!

1 min
246


रविवार गरम गरम गरम....!


र खरखत्या उन्हाने

वि चारही चांगलेच

वा ळून करपले

र खरखीत रक्षा मागे टाकत


ग ल्ली सोडून पुढे सरकले

र क्षा विचारांची

म ळभा सह उडाली

ग लिच्छ अशा वावटळाची फिरकी

र स्त्यात उठलेली

म लाच लपेटू लागली


ग लका उडाला

र द्दीच्या भावाने

म ला घेऊनच फिरू लागला


म्हणलं आज तरी सोड

रविवार आहे

तसा गलका कानाशी आला

आणि म्हणाला

आता सुटका नाही


फिरत फिरतच रहावे लागणार

केल्या कर्माचे भोग भोगावेच लागणार

मी सुखावलो

त्याला माहित नव्हतं

मी त्यातला नाही

त्यामुळे मला सावली सारखा

पुढ्यातच टाकून


वावटळीचा भोवरा दुर दूर

सरकत सरकत आकाशी भिडला

पाटीवरच उन्हं मात्र

पाठ चांगलंच शेकत होत

सावलीला पाहून पुढ्यात

सौभाग्य माझे उन्हातही हसत होत.....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational