STORYMIRROR

Trupti Naware

Inspirational

3  

Trupti Naware

Inspirational

चावी

चावी

1 min
1.0K


चावी


एका चावीच निमीत्त असतं

बंंद कुलपाला उघडायला

पण एका चावीचं निमीत्त झालं

शब्द ओठांवरले मुके व्हायला..


जसा कानात शिरणारा वारा

नि अंगावर येणारा शहारा

नुसत्या चावीच्या स्पर्शाने

हुडहुडी भरावी कुलपाला

काही दारं खरं तर


सताड उघडी असतात

पण वारा निमीत्त होतो

त्यांची उघडझाप करायला

एका चावीचं अंतर असत

दोन दारांमधली तफावत घालवायला


जसं कुणीतरी बोलावं ..काहीतरी

कुणीही घरात नसताना

त्याच्या अपुऱ्या श्वासात

आणि भरल्या कापर्या स्वरात

चावीच महत्त्व अगाध

कुलपाच्या कुलुपबंद आयुष्यात !!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational