Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shyamsuresh Gumangiri Giri

Inspirational

3  

Shyamsuresh Gumangiri Giri

Inspirational

जीवनाचे अर्थ

जीवनाचे अर्थ

1 min
575


जीवनाचे अर्थ


पासवर्डच्या जगात

अडकले एक मूल

मूल नव्हते ते अगदी

बागेतले एक फूल


अॉफर व कोडची

लागली त्याला आवड

रेड बस रेड बसमुळे

नाही त्याला सवड



तीन महिन्यातुन एकदा

मालक देतो पार्टी

तो मात्र चिटकला

नको शाळेतली कार्टी


पुण्यात मी आलो म्हणुन

किती चांगले झाले

स्किल मी शिकलो पण

गाव किती लांबले


एसी रुम सारखे जर

बाहेरचे जग असते

गावा-गावात गल्ली बोळात

दुकान मी थाटले असते


काम चांगले करुन

मी मिळवले प्रमोशन

6 हजारात कसे भागेल

याचे येते टेन्शन


होली है होली है

सगळ्यांनी रंग फासला

कोरड्या रंगाच्या गर्दीत

थोडा ओलावा दिसला


कॉर्पो रेटच्या दुनियेची

मी नवी चव पहातोय

चुलीवर उकळलेला चहा

आता नको वाटतोय


थोडी स्टाईल थोडा बदल

यालाच का जगणे म्हणतात

बर्गर पिझ्झा खाण्यासाठी

लोक रांगेत का थांबतात


मोबाईल कम्प्युटर मध्ये

मी एक्सपर्ट झालो

खेड्यातले जगणे नको मला

एसी चा दास झालो


ऑल इंडिया कस्टमर

मी बघा हँडल करतो

कस्टमर कसे खुश

याचे मॅनेजर नवल करतो


चार लोकात बसल्यावर

जगणे मला कळले

गावात राहुन काय उपयोग

इथं नशीब फळफळले


बेकारीचा राक्षस पाहुन

छातीत धस्स होते

असले जगणे नाही वाट्याला

मन थोडे सुखावते


उघड्या डोळ्यांनी पहातो

भौतिकवादाचा डिस्को नाच

संस्कृतीचा रोजचं -हास

अन् विकृतीचा नवा जाच


माणसा माणसांची शर्यत

अन् सगळीकडे पळापळ

जीवघेण्या वेगाने जीवन

पानांची कळत नाही सळसळ


विक एंडला नक्की येतो

धाब्यांना भयंकर महापूर

सगळेचं खात सुटतात

पैशांचा करतात चक्काचूर


नियमबद्ध शिस्तबद्ध

जीवन म्हणती व्यर्थ

गर्दी धक्काबुक्की

यालाच उरे अर्थ


असल्या विपरीत गोंधळात

मन हाका मारु लागते

एसी मधल्या हवेतुन

सुटका मागु लागते


शरीर अवघे चटावलेले

मनाचे काही ऐकत नाही

साध्या सरळ जगण्यात

अर्थचं वाटत नाही


सिमेंटच्या जंगलात

रस्ते दिसती नीटनेटके

हाच का विकासाचा अर्थ

जगणे झाले रामाविना पोरके


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational