Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shyamsuresh Gumangiri Giri

Others

2.9  

Shyamsuresh Gumangiri Giri

Others

माणसा तू हे जाण

माणसा तू हे जाण

1 min
72


कित्येक युगांपासुन

मानव रडला होता

अन्यायाने त्याचा श्वास

कोंडुन ठेवला होता ||1||


माणसासारखा माणुस

अस्पृश्य ठरवला होता

पिळवणुकीने त्याचा गळा

खुप वेळा चिरला होता||2||


उध्वस्त झालेली त्याची स्वप्ने

राखरांगोळी संसार होता

जुलुमांच्या हातांनी

बाजार मांडला होता||3||


क्रांतीकारकांनी पेटवला

स्वातंत्र्याचा नंदादीप

सत्याग्रहाची धार पाहुन

सूर्य सुद्धा ओशाळला होता||4||


स्वातंत्र्याची ज्योत तेवली

बलिदानाच्या समईने

सत्याग्रहाच्या मार्गाने

शत्रू नरमला होता||5||


समता, बंधुता, न्यायाची

बाग येथे फुलवली होती

एकत्मतेच्या सिंचनाने

संविधान बहरले होते||6||


आभाळासम भव्य मन 

पृथ्वीसारखी सहनशीलता

सुर्यासारखे तेज भीमाचे

चंद्रासारखी शितलता||7||


त्यांनी पाजले सर्वांना

समतेचे निर्मळ पाणी

जागवली मनामनात

मानवतेची राष्ट्रीय गाणी||8||


मुंगीपासुन गिधाडापर्यंत 

वेलीपासुन झाडापर्यंत

वाडीपासुन शहरापर्यंत

तुम्ही दिला कायद्याचा आधार||9||


तुम्ही मानवतेचे बी

संविधानात रुजवले 

सर्वांना एकच मतदान

लोकशाहीचे पाठ गिरवले||10||


हळूहळू सर्वांना समजतेय

संविधानातील तुमची करुणा

तिच्या निर्मळ वहाण्याने

बदलतेय इथली धारणा||11||


मुलभूत हक्क व कर्तव्यांची

आम्हाला झाली जाणीव

नितीमान समाजाची

भरुन निघतेय उणीव||12||


भारतीय संविधान

कायद्याची खाण आहे

देश कसा चालवावा?

याची पक्की जाण आहे||13||


संविधान सर्वोच्च मानून

देश चालवायचा आहे

विकासाची भगीरथ गंगा

देशात पोहचवायची आहे||14||


चुकीच्या गोष्टींसाठी

आम्ही भांडणार नाही

देशहित सर्वोच्च मानून

स्वार्थाला थारा देणार नाही||15||


आम्ही घेतला तुमचा वसा

त्याग आणि समर्पणाचा

सत्य व न्यायासाठी

आता मागे हटणार नाही||16||


सार्वभौम, समाजवादी भारत

संविधानाचा आहे प्राण

धर्मनिरपेक्ष गणराज्य भारत

माणसा तू हे जाण||17||


सामाजिक, आर्थिक, न्याय

हे आहे आमचे स्वप्न

राजनैतिक,सांस्कृतिक न्याय

विकासाचे आहेत रत्न||18||


विचार, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य

संविधानानेचं दिले आम्हाला

विश्वास, श्रद्धा उपासनेचे

मोल जाणुन घ्या सकळा||19||


राष्ट्राची एकता वाढवू या

एकात्मता पक्की करु या

संकल्प आपण करु या

मानवाचे मुक्तीदाते बनू या||20||


Rate this content
Log in