STORYMIRROR

Shyamsuresh Gumangiri Giri

Children Stories

2  

Shyamsuresh Gumangiri Giri

Children Stories

भाऊंचा बर्थ डे

भाऊंचा बर्थ डे

1 min
256

भाऊरायाचा आज आहे दिन 

घरी जमले मित्र तीन

बहीणीने बनवला केक छान

काकुने आणला गुलाब जाम


सगळ्यांची कशी पंगत बसली

आईने ठेवला चिवडा चकली

आजीच्या ताटात माशी पडली

काकुचे चमकले दात नकली


भाऊराया कसा ऐटीत फिरला

शेजार डॉगीला घाबरुन लपला

मावशीने दिलेला गॉगल फेकला

बाबांच्या टाळक्यावर तो बसला


मित्रांची टोळी माडीवर फिरली

पतंगाची काटाकाटी जमली

ताईने सोडली सायकलची हवा

गंप्याने केली ताईची वाहवा


काकांची तेवढ्यात स्वारी आली

सगळ्याची हवा पाचावर बसली

बाबांनी दिला छान छान टॉफी

सगळ्यांनी संपवली छान कॉफी


भाऊरायांचा साजरा झाला दिन

नवसाचे मित्र इन मिन तीन

भाऊला सर्वांनी शुभेच्छा दिल्या

मित्रांच्या सायकली जड झाल्या


Rate this content
Log in