STORYMIRROR

Shyamsuresh Gumangiri Giri

Inspirational

3  

Shyamsuresh Gumangiri Giri

Inspirational

खुणगाठ

खुणगाठ

1 min
186


नको काव्यात तुझ्या

व्यथा माझ्या मांडु

जगण्याची रित माझी

तुझ्या काव्यात सांडु


आटेल माझा पान्हा

झोळीत आहे तान्हा

दारिद्र्याच्या उराशी

आज आहे मी उपाशी


दारिद्रय घेऊन उराशी

तुझा बंगला बांधते मी

एक एक वीट उचलता

दु:खाचे हुंदके सोसते मी


माझे दु:ख आणि व्यथा

कुणाला कशाला सांगु?

दारीद्रयाचा शाप मजला

देवाशी का भांडु?


मनगाट बांधली मी

खुणगाठ झुंजण्याची

बुद्धीचे दोर तोडले मी

कर्माची आहे मी दासी


ना थांबणार आता

ना संपणार आता

दैवाशी पुकारले मी

महायुद्ध मी मघाशी



रचना

गिरी श्याम गुमानगिर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational