STORYMIRROR

Shyamsuresh Gumangiri Giri

Others

3  

Shyamsuresh Gumangiri Giri

Others

बाप

बाप

1 min
444



पोरा! पोरा! पोरा !!

बाप म्हणत सुटला

पोराचा ओ आला नाही

बापाचा कंठ सुकला


डोळ्यात अश्रुंची नदी

सोग्याने डोळे पुसला

माझं पोरं आलं का❓ म्हणुन

बाप लटपटत उठला


काठीने तोल सावरत

त्याने पार गाठला

केविलवाण्या नजरेने

वाट पाहत बसला


मळक्या टोपीत चाचपली

दहाची फाटकी नोट

सुरकुतल्या शरीरावर

तुळशीचा विठ्ठलहार


म्हातारी गेली आमदा

एकुलता एक पो-या सदा

वृंदावन अवघं सुकलं

राजंणातलं पाणी आटलं


घरावर फिरला नांगर

अंगण झाले उजाड

झोप नाही डोळ्याला

सगळीच कशी परवड


आयुष्यभर भजन करुन

पुण्याई सारी कमवली

कोणतं असं पाप होतं?

पोराची माय दुरावली?


श्वास आता जड झाला

बाप बाजंवर आला

सुरकुतले डोळे पाणावले

जीवन आता संपले


सांग विधात्या का ही परीक्षा?

नको मोक्ष एकचं मागणे

दे बाबा सगळ्यांना

आपुलकीचे देणे...

आपुलकीचे देणे...



Rate this content
Log in