STORYMIRROR

Shyamsuresh Gumangiri Giri

Abstract

2  

Shyamsuresh Gumangiri Giri

Abstract

सांगा कसा मी?

सांगा कसा मी?

1 min
376

सांगा कसा मी ?


वेलीवरच्या पानासारखा मी?

की वेलीतल्या कारल्यासारखा मी?

भुंग्याच्या डंखासारखा मी?

की नभातल्या चंद्रासारखा मी?


सागराच्या लाटेसारखा मी?

की गवतपात्यावरील दवासम मी?

शिशिरातल्या उन्हासारखा मी?

की निवडुंगाच्या काट्यासम मी?



जेवणातल्या मीठासारखा मी?

की चंदनाच्या सुगंधासम मी?

मातीतला शापीत श्वास मी?

की झाडातला चंचल वारा मी?


पाण्यावरची लहर मी?

की पावसाचा कहर मी?

महालातला शापीत गंधर्व मी?

की तपोवनातला स्वैर हिरण्य मी?


शांत कमलनयन मी?

की कोपीष्ट जमदग्नी मी?

झाडातल्या सावलीसम मी?

की झाडातल्या उन्हासम मी?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract