STORYMIRROR

Mina Shelke

Inspirational

3  

Mina Shelke

Inspirational

होळी

होळी

1 min
740


।। होळी ।।


होळी पेटवं तू मानवा

कुजक्या विचारांची

मनातले तिरस्कार ,मत्सर

हेवेदावे टाक जाळून एकदाची

अन घे भरारी राखेतून

फिनिक्स पक्षासारखी ...

कला शिकून घे रे आज

माणूस म्हणून जगण्याची ....

सडा टाक प्रेमाचा

सोड मनातला तिढा

उचल सौजन्याचा विडा

अंहकार तो कशाला

शाश्वत नसलेल्या रुपाचा

अन, आज इथे तर ऊद्या तिथे

फिरणाऱ्या नोटेचा ...

कशाला वागतोस

मनात ठेवून अढी

माणसाचीचं माणसाला जर

नसेल गोडी

कशी चालणार रे पिढी

जाळून टाक तू आज

मत्सराची मोळी

नको होऊस

जाळं विणलेले कोळी

शेवटाला कुणीतरी तोडणारचं

अन तुही चिरडणारचं

एक दिवस

तुझ्याही देहाची होळी

राखेतचं विरणार आहे

तुझंही अस्तित्व जिरनार आहे

आतातरी हो सावध ,अन

पेटवचं आज तु शेवटची होळी

दे आहुती सगळ्या विकृतींची काळी

कास धर मानवतेची

होऊ दे लव्हाळा

विनम्र तो मनाचा

मनामनात जागवं

मनस्पर्शी जिव्हाळा

चमकुदे आज खरी मानवता तुझ्यात जणू

लिहून गेली ह्या वळणावर शब्दवेडी मिनू......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational