सहज
सहज
सहज लिहायला बसलो, तुला शब्दात मांडायला गेलो.
भावनांच्या आधारे, तूझे स्वप्न पहायला गेलो.
शब्द खूप होते, पण मांडायला जमत नाही.
काय लिहावे आणी काय नाही, हे सुध्दा कळत नाही.
आज अचानक शुद्ध हरवली, भानही राहिले नाही.
कदाचित भावना मांडायला शब्दच उरले नाही.
खूप जवळ होतो मी, पण सापडत नवते काही.
यातही खूप आनंद होता, पण समाधान मनाला नाही.
