STORYMIRROR

Nalanda Wankhede

Inspirational

3  

Nalanda Wankhede

Inspirational

शिवरायांची गौरवगाथा

शिवरायांची गौरवगाथा

1 min
638


सह्याद्रीच्या कड्याकपारीत

गिरवीत होते धडे गनिमिकाव्याचे

सर केलेत एकामागून एक गडकिल्ले

तोरण बांधले स्वराज्याचे


मूठभर मावळे जिंकत होते

स्वराज्याची एक एक ढाल

गड येत होते पण सिंह जात होते

सुराज्याची पेटत होती मशाल


किल्ल्याभोवती खोदली खंदके

काटेकोर सुरक्षा केली गडांची

रयतेचा राजा न्यायी कर्तव्यदक्ष

सिंधुदुर्गासाठी फाडली छाती समुद्राची


बाजीप्रभूंची घोडखिंड जाहली पावनखिंड

हिरकणीचा बुरुज आठवण रायगडाची

मायलेकरांच्या प्रेमाची देते ग्वाही

यथायोग्य सन्मान हिंमतीच्या धाडसी शौर्याची


अभेद्य किल्ले शिवरायांचे

ऐकापेक्षा एक सरस आहे

जन्ममृत्यू दोन्ही गडांवर

योगायोग विलक्षण आहे


गडकिल्ल्यांची काय सांगावी महती

इतिहासाची आहे गौरवगाथा

असा राजा आता होणे नाही

तेजोमय, कणखर बाण्यावर टेकवावा माथा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational