STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

3  

Pandit Warade

Inspirational

कधी तू हसावे

कधी तू हसावे

1 min
908


कधी तू हसावे


कधी मी रडावे, कधी मी हसावे।

मला शांत करण्या सदा तू असावे।।धृ।।


नऊ मास पोटात सांभाळ केला।

किती कष्ट झाले तरी जन्म दिधला।।

तुझ्या प्रेम वर्षामध्ये मी नहावे।।१।।


शिकवतेस मजला मुखी घास घ्याया।

सुखे मी जगावे झिजवतेस काया।।

सदा प्रेम माझ्यावरी हे असावे।।२।।


कळेनाच येतो कसा शब्द ओठी।

मला बोलवाया तुझी साथ मोठी।।

मुखाने सदैवच तुझे गूण गावे।।३।।


मला सावरोनी कसे नीट केले।

जगा अंगणी तू मला धीट केले।।

सुखाचे सदा दान तुजला मिळावे।।४।।


जगी कोण मोठे तुझ्या सारखे गं।

गुरू ना कुणीही तुझ्या सारखे गं।।

कधी जीवनी ना तुला विस्मरावे।।५।।


शिकावे, इथे मी सुखाने जगावे।

तुझे स्वप्न सारे पुरे मी करावे।।

प्रभू नित्य ओठी तिचे नाव यावे।।६।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational