आयुष्याच्या वेलीवरती
आयुष्याच्या वेलीवरती
आयुष्याच्या या वेलीवरती
उमलते तू फुल नवे,
स्वरांच्या या पटलावरती
उभरते तू गीत नवे,
दुःखांच्या ह्या पहाडांवरुनी
कोसळून सुखाचा झरा हो,
जग चालु दे खोट्यावरती
पण तू मात्र खरा हो,
खरेपणाच्या ह्या बाहुल्यांचा
खेळ तू मांडू नकोस,
जगाच्या ह्या खोट्या नाटकात
वेळ तू दवडू नकोस,
लोक तुला ओढू बघतील
तू मात्र अविचल रहा,
लोक तुला सोडू बघतील
तू मात्र निडर रहा,
चंद्र झगमगतो एकटा
चांदण्या मात्र हजार लुकलूकती,
सूर्यही तो विराजितो एकटा
सर्व तयाभोवतीच फेर धरती,
रहा एकटाच तू
नको कोणाची सोबत तुला,
असे एकटाच स्वच्छंदी तू
नको खोटेपणाचे पाश तुला