STORYMIRROR

Dinesh Kamble

Inspirational

3  

Dinesh Kamble

Inspirational

तरुण देशातल्या तरूणा..

तरुण देशातल्या तरूणा..

1 min
1.4K


तरुण देशातल्या तरूणा..

_________________________


जगात सर्वात जास्त

तरुणाची संख्या असणाऱ्या

जगातील तरुण देशा ...

आणि या देशातील तरूणा

अरे तुला जाग का रे येत नाही..?


तू शिकलेला असूनही अंधानुकरण करतोस

गुंडगिरी , मवालीपणा आणि नैतिकतेची दलाली करून जन्मलेल्या राजकीय नेत्यांची.


स्वतःला तरुण म्हणवतोस ना तू .

अरे पण तुझ्या तारुण्याला लागलेल नव्हे तर जाणून लावलेल हे बेरोजगारीच ग्रहण कसे सुटणार विचार ना कधितरी स्वतः स्वतःलाच ...


तरुण म्हणता म्हणता तू आता

तिशीच्या पलीकडे झुकला

तरीही तुझ्या हाताला काम नाही लागू दिले रे

या भ्रष्ट नेत्यांनी..


तारुण्यात म्हणतात चेहरा चकाकत असतो, आत्मविश्वासाच्या तेजाने .

पण तुझा तर पार काळवंडला रे

वर्तमान , भविष्याच्या विचारात अन

बेकारीच्या न्यूनगंडाने ..



तू तरुण म्हणवतो.

बाप मात्र थकला ना रे तुझा .

झुकला ना तों म्हातारपणाकडे ?

सांग त्याने कुठवर पोसावे तुला.?

तू ही कधीपर्यंत तोडणार

आयते तुकडे ?


कळत रे मित्रा मला

तुझ्या उरातली कळ काय आहे तर .

समजू शकतो मी ही दाह

बेकारी , बेरोजगारीच्या वणव्याचा.

कारण मी ही

तुझ्याच सारखा

एक बेरोजगार आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational