STORYMIRROR

Prof. Dr.Sadhana Nikam

Inspirational

3  

Prof. Dr.Sadhana Nikam

Inspirational

दूर दूर माझे घर

दूर दूर माझे घर

1 min
1.8K


दूर दूर माझे घर

नदीच्या काठावर

तिथे पाखरे येती

सुस्वरे आळविती


दूर दूर माझे घर

नदीच्या काठावर

तिथे देवाचे मंदिर

वाजते घंटांची किणकिण


दूर दूर माझे घर

नदीच्या काठावर

तिथे लागती समाधी

मिळे मनाला शांती


दूर दूर माझे घर

नदीच्या काठावर

तिथे पानांची सळसळ

तरी निरव शांत


दूर दूर माझे घर

नदीच्या काठावर

तिथे चंद्रमौळी झोपडीला

चंद्राचीच आसक्ती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational