STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Inspirational

5.0  

Dilip Yashwant Jane

Inspirational

गणपती

गणपती

1 min
4.9K


दान दे मज ईश्वरा

बुद्धी अन् चातुर्याचे

राहो सदा कृपादृष्टी

वर असो ममत्वाचे


नामे किती देवा तुझी

गजानना गणपती

भक्त गातात सारेच

भालचंद्रा तुझी स्तुती


सुखकर्ता दुःखहर्ता

तूच सारा विघ्नेश्वर

वक्रतुंड एकदंत

देवा तू मयुरेश्वर


हाती अंकूश परशू

शस्त्रे दिसती शोभून

लाडू आणिक मोदक

तृप्त होतोस खाऊन


कर्णा परी देवा तुझ्या

कान माझेही असावे

असो श्रवण नित्यची

नाव तुझेच ऐकावे


लाहो सदा रे संगत

गोड तुझ्या आरतीची

अलौकिक तूच देवा

आस तुझ्याच कृपेची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational