STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

पृथ्वी

पृथ्वी

1 min
326

पृथ्वीचा आधार झाडांना 

झाडांचा आधार पृथ्वीला 

संकट येते त्यांच्यावर 

धोका येतो मानवाला 


हे विश्व सत्य आहे

कधी कळणार मानवाला 

जेव्हा संकटात जग

मह्त्त्व येई प्राणवायूला 


याचा परिणाम भूतलावर 

त्सुनामी, भूकंप, महापूर 

याचा सबंध निसर्गाशी 

गारपिटी, ढगफुटी धरतीवर 


नाही आळा प्रदूषणाला 

मानवी जीवनावर घाला 

अती वृक्षतोड भोवली 

माणसाच्या विनाशाला  


असे येती भयंकर रोग 

नियंत्रणाच्या पलीकडे 

 घेतले बळी माणसाचे 

औषध सापडेना कुणीकडे 


मह्त्त्व झाडांचे जाणा 

सत्यात रोग आवरेना 

प्राणवायुची किंमत अनमोल 

जीवदान द्यारे झाडांना 


सूडबुद्धी नको वृक्षांशी 

असो कितीही दुष्मनी 

जतन करून वृक्षांचे 

 खत, पाणी द्या सेवनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational