आई तुझ्याविना...
आई तुझ्याविना...
आई तुझ्याविना या जगती
कुणी थोर नाही,
आई तूच माझी देवता
अन् तूच माझा साई.
आई तुझ्याविना नाही
माझ्या जीवना आकार,
तूच मला जिद्द देसी
करण्या स्वप्न माझं साकार.
आई तुझ्याविना नाही शक्य
माझ्या जीवनाचा उद्धार,
असं कसं मी जगू
हे जीवन निराधार.
आई तूच माझा श्वास
अन् तूच माझा ध्यास,
सदैव राहो माझ्यापाठी
तुझ्या मायेची आस.
