पहाट उद्याची
पहाट उद्याची
चल गड्या रं,चल मर्दा रं
आता वाट प्रगतीची धरू
आलेली तुफान वादळे
आपण सारे नष्ट करू
अडचणीवर मात करून
संघर्षात विजयी होऊ
परिस्थितीच्या संकट काळी
विजयाकडे चालतच राहू
प्रयत्नाच्या जोरावर आपले
दिवस दु:खाचे सरतील
कष्टाच्या जोडीने माणसाला
दिवस सुखाचे येतील
निसर्गात परिवर्तन होणार
आपत्तीस धैर्यानं तोंड देऊ
कशालाही का घाबरता?
सर्व विजयी आपण होऊ
संयम पाळू,या
शांती ठेवू या
अफवांच्या राक्षसांचे
दहन आपण करू या
धीर मानवा द्यारे
आधार माणसा व्हारे
माणूसकीचा धर्म पाळून
एकमेका सहाय्य करा रे
विश्वाची माऊली होऊन
मार्ग सत्याचा दाखवा रे
त्यांना हिंमत देऊन
जगण्याची शक्ती द्या रे
दु:ख माणसाला कळावे
हे निसर्ग राजा सांगतो
संकटात ही माणसाला
जगण्याचे शिकवितो
एक दिवस तुझा रे
सुखाचा असेल
दु:खातून पोळलेला तू
खरा आनंदी दिसेल
