मला राहून - राहून वाटतं...
मला राहून - राहून वाटतं...
मला राहून - राहून वाटतं...
उगाच मी मन मारून जगत आलो ...
अन लोक काय म्हणतील ?
याचाच विचार करत आलो ...
खूपदा वाटतं ...सालं जगायचंच राहून गेलं
जगावं बिनधास्त स्वच्छंदी , मनसोक्त ...
तसं ठरवतो ही पण क्षणभर पण कसलं काय ..
पुन्हा तेच पांढरपेशी मानसिकता दुसरे काय ?
लोकांचं काय असही बोलतात तसही बोलतात
आपल्याच सोयीनुसार इतरांना तोलतात ...
मला राहून - राहून वाटतं ...नकोच ते रटाळ जिणं
टीचभर पोटाची खळगी भरण्यास एवढी पायपीट करणं ..
हरेक नात्याला न्याय देत चालत आलो इथवरी
कळेचना मज काही , का मग ही भिक्षांदेही ...
मला राहून - राहून वाटतं ...संघर्ष अटळ पण ...
जीवघेणा खडतर प्रवास, कुठवर अन का तरी ?
मला राहून - राहून वाटतं संपेल हा वैशाखवणवा..
पुन्हा बहरेल पाने - फुले , नवचेतना जागवेल तन- मना
फक्त एवढी अभिलाषा.. माणूसपण जिवंत असू दे रे ...
देवा ! आनंद या जीवनी सुगंधापरी दरवळावा ..
