जेव्हा आई नसते तेव्हा
जेव्हा आई नसते तेव्हा
नकळत अश्रूंची धारा
ती काळजात दाटे
जेव्हा आई नसते तेव्हा
एकटेपणा वाटे
माया, ममता हरवता
मनात दु:ख दाटे
जेव्हा आई नसते तेव्हा
एकटेपणा वाटे
भूक, तहानेने ह्रदय
व्याकुळतेने दाटे
जेव्हा आई नसते तेव्हा
एकटेपणा वाटे
जीव कासावीस होऊनी
वेदनेसंगे दाटे
जेव्हा आई नसते तेव्हा
एकटेपणा वाटे
पेलताना काळजामध्ये
असंख्य दु:ख दाटे
जेव्हा आई नसते तेव्हा
एकटेपणा वाटे
