खंत मनातील
खंत मनातील
1 min
152
आज खंत मनातील
कुणा सांगावी कळेना
भाव भावनांना मात्र
काही ठाव तो मिळेना
रोज नव्याने होणार्या
प्रश्नांना वाट भेटेना
मनातील उणीवांना
परी जागाच भेटेना
काय ? कशासाठी कुणा
भावार्थच सापडेना
मनातील खंत मात्र
काही केल्या ती आडेना
