आयुष्य जगत रहा
आयुष्य जगत रहा
नाही जगता आले सुखात
तर कधी नाराज नका होऊ
जीवनाच्या वाटेवर थोडे
फार प्रयत्न करूनी ते पाहू
सांगणारे खूप सारे भेटतील
त्यांचे जरा ऐकून सुध्दा घेऊ
सुविचारांचे सत्र मात्र मनी
कायम आपण जपून ठेऊ
दोष देणारे जवळच ते
तुझ्या फिरत रे असतील
ओळखूनी माणसांना तू तरी
ते गालातल्या गालात हसतील
