राजमाता जिजाऊ
राजमाता जिजाऊ
1 min
287
राज्य कसे उभारावे
सांगे जिजाबाई भारी
स्वराज्याची जननी ती
झाली जगण्याची वारी
जन माणसांची मने
ओळखली तिने खास
बाळ शिवबाला दिली
छान संस्काराची कास
माय माऊली होऊनी
शूरवीर घडविले
धैर्य शौर्याचे कसब
मावळ्यांना शिकविले
तार गनिमी काव्याची
शिकविली जगी भारी
तेजपुंज स्वराज्याची
अनमोल झाली नारी
जिद्द चिकाटीचे बळ
पावलोपावली पाहे
इतिहासातील पान
सदा अखंडीत वाहे
जाणीवेची कर्तव्याची
जाण शिवबाला दिली
परस्त्रीला सन्मानाने
चोळी बांगडी ती दिली
ऊर्जा स्वराज्याची थोर
राजमाता जिजाबाई
अनमोल रत्नांची तू
एकमेव झाली माई
