लेखणी
लेखणी
काव्य लेखणी चमके
ज्योत दिव्यत्व फुलवी
शोभे चांदणे कोंदण
सुख दुःखाची पालवी
ध्येय क्षितिजा पल्याड
सजे सौंदर्य बुद्धी रंग
धरे सत्याचा पदर
हित समाज तरंग
शब्द मोहिनी अप्सरा
दिपोत्सव कोहिनूर
स्पर्श परिस आरसा
दिव्य प्रकाश मधुर
मृदगंध धुंदमस्त
अलौकिक पखरण
पुण्य थोर फेडे ऋण
लीला दातृत्व शिंपण
निमिषार्ध वरदान
घडे काव्यांचे गुंजन
भविष्याचा कवडसा
चढे सार्थकी जीवन
