STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

जीव की प्राण

जीव की प्राण

1 min
270

लाजून हसतेस छान

मी पाहून झालो बेभान,

तू माझा जीव की प्राण

ये सखे दे अलिंगन...!


चातकावाणी का झुरायचं

विरहात का तडफडायचं,

कधी दोघे एक व्हायचं

दे सजनी मला चुंबन...!


किती झुरायचं दिनरात

किती पहायची ग वाट,

होईल कधी त्रप्त हे मन

होऊ दे सखे मिलन...!


रंभा,अप्सरा, मेनका, उर्वशी

तू लैला या मजनूची,

तूझ्यासाठी जीव तळमळतो

तू ग सौंदर्याची खाण...!


लाजून तू ग हसतेस

नाजूक कळी तू दिसतेस,

सजनी सजनासाठी या

टाक तोडून सारे बंधन...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational