STORYMIRROR

Surekha Maid

Inspirational

3  

Surekha Maid

Inspirational

आई

आई

1 min
304

हृदयात  सदैव आईचीच  मूर्ती 

आठवता तिला  मिळे  मला स्फूर्ती ..//१//


दिले  आम्हा  तिने  उत्तम  संस्कार

जगताना असे  तिचा मोठा आधार ..//२//


तिच्या मामतेचा  जिव्हाळ्याचा पदर

नाही  त्याला  आहे  कशाचीच सर ..//३//


कष्टात   खूप   आम्हा   वाढवले 

शिकण्यासाठी आम्ही स्वतःला झिजवले ..//४//


अंतःकरणातील भाव सहज ओळखते

मला काय हवे ते क्षणार्धात सांगते ..//५//


ओढ  तिच्या प्रेमाची सदा  लागली 

ऊर्जा - प्रेरणा कायमच मजला दिधली ..//६//


हळुवार तिची फुंकर क्षणात जखम भरी 

हळव्या मनस्थितीत तीच हृदयाशी धरी ..//७//


विकल असता तीच आठवे मन गाभारी 

आशेचा तिचा शब्द देई मना उभारी ..//८//


आई येते आठवण तुझी क्षणोक्षणी

उणीव  तव  भासते  रोजच  मनी ..//९//


माझ्या दुःखा येई तिच्याच डोळ्या पाणी 

मनातील माझी खळबळ तीच फक्त जाणी //१०//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational