पर्यावरणाचे संरक्षण
पर्यावरणाचे संरक्षण
पर्यावरणाचे संरक्षण पृथ्वीवरी
निसर्ग देवता ही अन्न-पाणी दात्री
तरुवर लावण्याने दारोदारी
भरपूर पावसाची मिळे खात्री ...//१//
काम आहे हे लाखमोलाचे
वृक्षे, फळे - फुले - सावली देती
मिळे शुद्ध हवा व पाणी
पाखरेही निवा-याला येती ...//२//
एक झाड प्रत्येकी लावून, जगवू
पुकारते रे तुज धरणीमाता
अजूनही तू जाग मानवा
निसर्ग चक्र सारे बदलले आता ...//३//
देती अमुल्य प्राणवायू मनुष्यास
वड, पिंपळ, लिंब निसर्गाची शान
या संपत्तीचे करू आता रक्षण
भावी पिढीला होईल ते वरदान ...//४//
भूजल पातळी खोल खोल चालली
संकल्प करुया पाणी साठवण्याचा
वसुंधरेला प्रदूषणापासून रोखण्याचा
चराचरातील घटक वाचवण्याचा...//५//
