अस्तित्व स्त्रीचे
अस्तित्व स्त्रीचे
अगणित तव उपकार नारी
शान असे तू कुटुंबाची
संदेश, दिशा देते प्रगतीची
प्रकाश ज्योत तू ज्ञानाची...//१//
आजची कणखर निडर स्त्री तू
धरतेस कास विज्ञानाची
भाकरी थापतेस कष्टाची
विश्वाची जननी वात्सल्याची...//२//
नारी शक्ती - जगात भारी
बहरू दे तुझे व्यक्तिमत्व
समानतेचा आहे कायदा जगी
जप तुझे अस्तित्व नि स्वत्व...//३//
तव लक्ष्याचा घे तू ध्यास
बाळग स्वतःत आत्मविश्वास
अबला नाहीस तू आता
दूर कर साऱ्यांचा भ्रमनिरास...//४//
कुठलेच असे क्षेत्र नाही जगात
जे तू नाही केलेस पादाक्रांत
कणखर खंबीर कर्तृत्वाची मूर्ती
पोहोचलीस जाऊन अंतराळात...//५//
तुझ्याविन अशक्यच आहे चराचर
सन्मानित होते नारी जिथे
पूजनीय, वंदनीय तू जगताची माय
ईश्वर वसे सदा गृही तिथे...//६//
