STORYMIRROR

Dipak Pathak

Inspirational

3  

Dipak Pathak

Inspirational

आई

आई

1 min
173

खरं म्हणजे आई नाव काढलं की...

गोड गोड, दुधावरची साय

वासराला वेताच, चाखणारी गाय

आणि

मऊ स्पर्शाच्या, मऊ असणारी माय...दिसते...||१||


खरं म्हणजे आई नाव काढलं की...

बाप रागावता, पदराआड लपवणारी ढाल...

ठेच लागताच मुखी, आई ...गंऽऽ शब्दाची चाल..

आणि

बरं नसल्यावर,सुरकुत्या हाताची शाल... आठवते ||२||


खरं म्हणजे आई नाव काढलं की...

खाऊ घालताना, हाताची चव ओतणारा घास,

दचकल्यावर कधी,मायेचा डोईवर असलेला भास,

आणि

ऊर भरल्यावर, ह्रदयाला पुरणारा श्वास... असतो...||३||


आई कधी, शब्दात बंदिस्त होत नसते,

आई म्हणजे आई असते...

तुमची व माझी सेम असते...


आईचा कधी, दिवस नसतो 

आई म्हणजे प्रत्येकाचा नित्य नवा जीव असतो... 

प्रत्येकाचा प्राण असतो.. 🙏🙏


Rate this content
Log in

More marathi poem from Dipak Pathak

Similar marathi poem from Inspirational