होळी
होळी
गुलाबी रंगात
तुझं ते माझ्यावरचं
जीव लावणं...
हिरव्या रंग रूजव्यात
सारं मन
एकरूप करणं...
लालेलाल होऊन
सगळं सगळं कसं
मनसोक्त स्वाहाः करणं...
खरंच
तीच होलीका.
तीच होळी
अन्
तीच रंगपंचमी
भावनांची...
रंगलो
भिजलो
सप्तरंगी जाहलो...

