आई
आई
आई तुझ्याच साठी तेवतात
नयनांच्या ज्योती
माझ्याचसाठी वाहतात तुझे
अनमोल मोती...
माझ्याभोवती फुलल्या तुझ्या
कित्येक आशा
तुझ्याकडे पाहून जाते
माझी निराशा
तुझ्या शब्दांनी मिळे
मला दिलासा....
तुझ्याच मांडीवर नितांत निजले
मायेने तुझ्या स्वप्न माझे सजले
स्पर्शाने तुझ होते मी वेदनामुक्त
तुझ्या कुशीत विसावते मनसोक्त..
तुझी पाऊले पुजताना
फुलापरी माझ्या हातांना
ऋण तुझे फेडण्यास नको
दुसरी ओटी
पुन्हा जन्म मिळो आई
सदा तुझ्याच पोटी
