STORYMIRROR

Surekha Chikhalkar

Others

3  

Surekha Chikhalkar

Others

माय माझी

माय माझी

1 min
10


माझ्या लुळ्या पांगळ्या देहाला

आस तुझ्या ग प्रेमाची,

होते चिटकून जमिनीला माय

तू किरण माझ्या आधाराची....


नाकारले माझे अस्तित्व ग माये

केलंस जिवाचं रान तू माझा आनंद गवसला,

मीठ भाकरी खाऊन दिनरात तू

माझ्या जीवनी प्रकाश पसरला..


तुझा साधाभोळा ग स्वभाव माय

केलीस शरीराची ढाल माझे झालीस तू पाय,

तुझा फाटका संसार ना कुणाचा आधार

माझ्या अंधाराला दिलेस उजेडाचं दान माय...


तुझ्या कष्टाचं ग झालं सोंन

मला दाखवलीस सुखाची वाट,

माझ्या काळोख्या आयुष्याची माय

तू ग झालीस सोनेरी पहाट...


कशी होऊ ग तुझी उतराई

तुझ्या पायी देते माझ्या जिवाचं ग दान,

ओवाळीन जीव माझा तुझ्या पायी 

माय आहेस तू माझी याचा अभिमान


काव्यांकन

सुरेखा महिपती चिखलकर


Rate this content
Log in