देवी चंद्रघण्टादेवी
देवी चंद्रघण्टादेवी
तिसरे पुष्प वाहू चला
देवी चंद्रघण्टादेवीला,
अलौकिक ज्ञानप्राप्ती लाभे सर्वांना
साकडे घालू माझ्या आईला....
काय वर्णावी तिची महती
आली सिंहावर बसुनी,
आगमन होता सुगंधाचा आनंद
गर्जे चोहिकडे दिव्य ध्वनी....
मस्तकावर शोभे अर्धचंद्र
सोन्यासारखे रूप तिचे,
माथ्यावर मधे तिसरा डोळा
शृंगार तिचा मनात साचे ....
दशभुजाधारी शौर्याची मूर्ती
हाती कमळ,धनुष्य तीर,
तिच्यासावे सदा जपमाला,त्रिशूळ
कमंडल,गदा,तलवार. ..
विनवण्या ती शिवाला
घेई अवतार पार्वतीचा ,
नैवेद्य तिचा दुध साखर
नाश करी रोग ,दुःखाचा....
करता तिची आराधना
पूजन तिचे वरदान होते ,
मनात धरावी आस
प्राप्त साहस, निडरता येते....
