STORYMIRROR

Surekha Chikhalkar

Others

3  

Surekha Chikhalkar

Others

कातरवेळ

कातरवेळ

1 min
8


कातरवेळ खुणावू पाहतेय

मावळतीची संध्याकाळ,

मूक क्षणांचा साखळदंडांनी

बांधून ठेवलेला भूतकाळ....


पावलं आता विसावत चालली

निशब्द उलघडत आठवणी ,

आठवांचा माजतो काहूर

नात्यांची पानगळ जीवंतपणी...


भ्रमात साठवलेला अपेक्षांचा

आवरायला हवा आता पसारा ,

येता होते हात रिकामे माझे

उगीच अडकण्याचा कशाला अट्टाहास सारा


शोधते मी स्वतः अवती भवती

एकांतने दिली केव्हाच चाहूल ,

मावळतीच्या वाटेवरती मनाच्या

चोरपावलांनी कधीच दिली हूल..


Rate this content
Log in