ब्रह्मचारिणी देवी
ब्रह्मचारिणी देवी
1 min
230
मां माझी ब्रह्मचारिणी
प्रसन्न तिचे रूप ,
कमंडलू ,जपमाळ सदा
वृध्दी विजयाचे स्वरूप...!!१!!
स्वच्छ सुंदर पांढरा
अंगावरी रंग तो छान ,
पंचामृत ,साखर तिच्या
नैवेद्याचा असे मान....!!२!!
कमळ पुष्प असे प्रिय
संयम शिकवी मनाला ,
करुनी आराधना निर्जल
निराहार प्राप्त केले शिवाला...!!३!!
वाहू दुसरे पुष्प
संयमाचा रंग ल्यावा ,
करू कामना राउळी
सदनी स्त्रियांचा सन्मान व्हावा..4
