देवी कुष्मांडा
देवी कुष्मांडा
चौथे आगमन माझी अष्टभुजा
कुष्मांडादेवी सिंहावरी आली ,
सूर्यासम तिची शरीरकांती
निळा रंग ती ल्याली ....
दुसरे नाव तिचे श्री अष्टभुजा
प्रभा तिची सभोवार,
निर्मिले ब्रम्हांड मंद स्मिताने
पूजा बांधावी तिची साभार...
हाती कमंडलू ,धनुष्य बाण
कमळ ,चक्र ,गदा ,
शोभून दिसे आई
अमृतपूर्ण कलश सवे सदा...
सामावले तिच्यामध्ये विश्व सारे
करावी तिची आराधना भक्तिभावे ,
नैवेद्य तिचा कोहळ्याचा
आयुष्य ,यश, बळ, स्वास्थ ती दावे..
निर्मितीची ऊर्जा देई
नवदुर्गा जागर सजला दारी,
बुध्दीमताविकास,निर्णयक्षमता रोगाचा नाश
करता पूजन कुष्मांडा देवी कृपा करी.
