धुलीवंदन
धुलीवंदन
*धु* :- धुलीवंदन करू साजरा प्रेमाने
सारे जमू एकत्र,
रंगाची भाषा सांगते
कुणी ना येथे सावत्र..
*ली* :- लीला सप्तरंगाच्या कृष्णाची
राधे सह उधळू चला ,
विसरून सारे हेवे दावे
संस्कृती आपली जपू चला..
*वं*:- वंचीत ना राहो कुणी येथे
मनामनात रंग भरू ,
लाल पिवळा निळा हिरवा
मनामनात रंगबेरंगी करू
*द*:- दक्ष राहून केमिकल
रंगाचा वापर टाळा,
लावून कोरडा रंग
पाणी वाचवून नियम पाळा
*न*:- नसावा द्वेष अन् चेष्टा
मनात दूजाभाव
पाण्यासारखे मिसळून जाऊ
वसेल जणू प्रेम रंगाचा गाव
*अ*:- असावे आनंदी सदा
वसे गोकुळ नंदन,
नको घातक रंग
चिखल मातीचे धुलिवंदन
*से* :- सेवाभाव मनी
मिळे इथे एक चेतना,
देऊन साथ नेहमी
बनून सदा एक प्रेरणा..
*अ*:- असावी लयलूट रंगाची
देवघेव ही स्नेहाची,
आनंद वाहतो घरी दारी
बांधू कमान ऐक्याची..
*सा* :- साथ देते पाना फुलांचे रंग
हात धरू निसर्गाचा,
जीवनात भरू रंग
नात्यातल्या प्रेमाचा..
*वे* :- वेगवेगळे ते रंग सारे
रंगाने ठरवू नये जाती,
मनामनात जागवू प्रेम
नसावी जाती धर्माची भीती
