शैलपुत्री देवी
शैलपुत्री देवी
आश्विन ती
प्रतिपदा ,
आगमन
नवदुर्गा (१)
सुशोभित
चराचर ,
हर्ष दाटे
चोहीकडे (२)
वंदू चला
उत्सवाला ,
आल्या लाल
पावलांनी. (३)
पंचपात्र
बीज पेरू ,
नंदादीप
अखंडित (४)
मालाबंध
परिधान ,
रंग नाना
नवरात्री. (५)
प्रथम ती
हिमालय,
शैलपुत्री
आराधना. (६)
भाळी टिळा
अर्धचंद्र ,
डाव्या हाती
कमळाला (७)
नऊ दिस
नऊ रूपे ,
अंबाबाई
जागर तो (८)
कृपा राहो
कीर्ती ,भक्ती ,
सुख धन
शांती देवो (९)